पुणे झेडपीत अंकिता हर्षवर्धन पाटील यांची पुन्हा कोंडी; स्थायी समितीतून माघार

काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने पुणे जिल्हा काॅंग्रेसने त्यांना असहकाराचे धोरण कायम ठेवले आहे. पाटील यांच्या कन्या अंकिता यांना स्थायी समितीवर जाण्यास विरोधाचे धोरण काॅंग्रेसने कायम ठेवले. त्यामुळे काॅंग्रेसचा कोणताच सदस्य पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत जाऊ शकला नाही.
पुणे झेडपीत अंकिता हर्षवर्धन पाटील यांची पुन्हा कोंडी; स्थायी समितीतून माघार

पुणे : पुणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गतवादाचा पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्याच्या रिक्त जागेला बसला. अंकित यांना बिनविरोध निवडून देण्यास जिल्हा काॅंग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविल्याने हा वाद सुटलाच नाही. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांच्यासह काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांनी सोमवारी झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत तीन तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर माघार घेतली. यामुळे अखेर दोघांच्या वादात पुन्हा एकदा ही जागा रिक्त राहिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या आकस्मिक निधनाने ही जागा रिक्त झाली होती. स्व. पाटील यांच्या जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील विक्रमी मताधिक्य मिळवत निवडून आल्या होत्या.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २२ आँगस्ट २०१९ च्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार होती. परंतू या जागेवर कोण? अंकिता पाटील की दत्तात्रेय झुरंगे या काँग्रेसमधील दोन इच्छुकांमुळे ही सभाच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा आज (ता.९) पुन्हा बोलावण्यात आली होती. या सभेत अंकिता पाटील आणि दत्तात्रेय झुरंगे या दोघांनीही माघार घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com