शिवसेनेला केजमध्ये मिळाला तगडा खेळाडू ; भाजपच्या डॉ. अंजली घाडगे शिवसेनेत

शिवसेनेला केजमध्ये मिळाला तगडा खेळाडू ; भाजपच्या डॉ. अंजली घाडगे शिवसेनेत

बीड : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेने लोकसभा निवडणुकीत थेट भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केलेल्या डॉ. अंजली घाडगे यांच्या पदरी निराशाच पडली. आता त्यांनी मातोश्रीची पायरी चढत शिवसेनेची वाट धरली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना प्रवेश केला. शिवसेनला त्यांच्या रुपाने तगडा खेळाडू भेटला आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत केज या राखीव मतदार संघातून ऐनवेळी कॉंग्रेसकडून निवडणऊक लढवताना डॉ. अंजली घाडगे यांनी 35 हजार मतांचा पल्ला पार केला. मात्र, अचानक निवडणुक रिंगणात उतरलेले उमेदवार पराभवानंतर दिसत नाहीत किंवा लाटेत विजयी झालेले राजकारणात फारकाळ टिकत नाहीत अशी शेकडो उदाहरणे असतात. मात्र, डॉ. अंजली घाडगे याला अपवाद ठरल्या. अचानक रिंगणात उतरावे लागलेल्या डॉ. घाडगे यांनी पराभवानंतरही मतदार संघातील संपर्क तुटू दिला नाही. त्यानंतरही त्यांनी मतदार संघातील सक्रीयता कमी होऊ दिली नाही. 

परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडून थेट भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला. तत्कालीन भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या ऐवजी उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडेल असा त्यांचा अंदाज होता. परंतु, ऐनवेळी चक्र फिरले आणि नमिता मुंदडा यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आता त्यांनी शिवसेनेची वाट पकडली आहे. सोमवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, बाळासाहेब अंबुरे, रत्नाकर शिंदे उपस्थित होते. दरम्यान, मतदार संघातील दांडगा संपर्क आणि निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्याची क्षमता असल्याने शिवसेनेलाही भविष्यासाठी तगडा खेळाडू डॉ. घाडगेंच्या रुपाने मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com