anil sole nagpur | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अनिल सोले, आमदार, नागपूर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

शिक्षक, नगरसेवक, महापौर व आमदार असा प्रवास करणारे अनिल सोले भाजपच्या नागपूर शहरातील मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत गोटातील म्हणून ओळखले जातात. शाळेत गणिताचे शिक्षक असलेले अनिल सोले यांनी गणित विषयात एम. एससी.ची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार लाभलेले सोले 1992 मध्ये पहिल्यांदा नागपूर महापालिकेत निवडून आले. एका अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांच्याकडे त्यानंतर विविध जबाबदाऱ्या आल्या. नागपूर भाजपचे अध्यक्ष, नागपूरचे महापौरही झाले. नितीन गडकरी लोकसभेत निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून अनिल सोले यांची विधान परिषदेवर निवड झाली.

शिक्षक, नगरसेवक, महापौर व आमदार असा प्रवास करणारे अनिल सोले भाजपच्या नागपूर शहरातील मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत गोटातील म्हणून ओळखले जातात. शाळेत गणिताचे शिक्षक असलेले अनिल सोले यांनी गणित विषयात एम. एससी.ची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार लाभलेले सोले 1992 मध्ये पहिल्यांदा नागपूर महापालिकेत निवडून आले. एका अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांच्याकडे त्यानंतर विविध जबाबदाऱ्या आल्या. नागपूर भाजपचे अध्यक्ष, नागपूरचे महापौरही झाले. नितीन गडकरी लोकसभेत निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून अनिल सोले यांची विधान परिषदेवर निवड झाली. साहित्याची आवड असणारे अनिल सोले हे कवी सुद्धा आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख