आजचा वाढदिवस : अनिल राठोड - शिवसेना, माजी आमदार - anil rathod ex mla | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : अनिल राठोड - शिवसेना, माजी आमदार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 मार्च 2018

नगर शहरात भैय्या हे नाव म्हटलं की शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हेच नाव पुढे येते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी तातडीने धावून जाणारा, संबंधित प्रश्नावर तक्रारदारासमोरच अधिकाऱ्यांना संपर्क करून दोन शब्द सुनावणारा नेता म्हणून राठोड यांची ख्याती आहे. पाच वेळा आमदार, एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून राठोड यांची कारकीर्द गाजविली. त्यांनी मातोश्री ट्रस्ट, नेता सुभाष तरुण मंडळ, मातोश्री वृद्धाश्रम, धर्मवीर जगदीश भोसले पतसंस्था आदी संस्थांची स्थापना केली. नगर शिवसेनेचे शहरप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे उपनेते आदी पदे भूषविली.

नगर शहरात भैय्या हे नाव म्हटलं की शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हेच नाव पुढे येते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी तातडीने धावून जाणारा, संबंधित प्रश्नावर तक्रारदारासमोरच अधिकाऱ्यांना संपर्क करून दोन शब्द सुनावणारा नेता म्हणून राठोड यांची ख्याती आहे. पाच वेळा आमदार, एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून राठोड यांची कारकीर्द गाजविली. त्यांनी मातोश्री ट्रस्ट, नेता सुभाष तरुण मंडळ, मातोश्री वृद्धाश्रम, धर्मवीर जगदीश भोसले पतसंस्था आदी संस्थांची स्थापना केली. नगर शिवसेनेचे शहरप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे उपनेते आदी पदे भूषविली. 1990 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना संधी दिली. त्या वेळी त्यांनी बाजी मारली. त्यानंतर सलग चार वेळा विधानसभेचे सदस्यत्त्व मिळविण्यात ते यशस्वी झाले. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम ते अविरत करीत असतात. आगामी निवडणुकीसाठी ते तयारीनीशी सरसावले आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख