सत्तेतील आमदार पाहिजे की विरोधी पक्षातील ? : डॉ. अनिल कांबळे - anil kambale and bjp in state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

सत्तेतील आमदार पाहिजे की विरोधी पक्षातील ? : डॉ. अनिल कांबळे

युवराज धोतरे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

उदगीर : केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता येणार आहे, उदगीर विधानसभेतील मतदारांनी विकासासाठी सत्तेतील आमदार पाहिजे की विरोधी पक्षातील याचा विचार करून मतदान करावे असे आवाहन उदगीर येथील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी केले. आज शहरातील विविध प्रभागात कांबळे यांच्या प्रचारासाठी बैठका घेण्यात आल्या. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना काबंळे यांनी हे आवाहन केले. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. 

डॉ कांबळे म्हणाले, पंधरा वर्षे सत्ता असूनही उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारला अपयश आले. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता येताच लिंबोटी धरणातून उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली, त्याचे कामही सुरू झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करायचे असेल तर पुन्हा सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडूण येणे गरजेचे आहे. ही योजना गतीने कार्यान्वीत व्हावी असे वाटत असेल तर भाजपला बहुमताने निवडून द्या. राज्यातील शेतकरी वर्गाला कितीतरी पटीने जास्त विमा देण्याचं काम भाजप सरकारने केले आहे. किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना व कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी केले आहे. 

शेतमजूर व ज्या नागरिकांना घरे नाहीत अशा लोकांसाठी तीन लाख रुपयाची घरकुल योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे काम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मतदारसंघाचा आणि येथील जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर भाजपला साथ द्या असे आवाहन देखील कांबळे यांनी यावेळी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख