नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संधी द्या - डॉ अनिल कांबळे

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संधी द्या - डॉ अनिल कांबळे

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्‍यातील मतदार सुशिक्षित व अतिशय हुशार आहेत. कुण्या चुड बुडक्‍याच्या रडण्यावर आपले अनमोल मत व्यर्थ घालणार नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उदगीर व जळकोटच्या नागरिकांनी फक्त विकासासाठी मत देवून मला संधी द्यावी असे आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार डॉ अनिल कांबळे यांनी केले आहे. 

शुक्रवारी मार्केट यार्डात झालेल्या प्रचार बैठकीत ते बोलत होते. भाजप सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामांना गती मिळालेली आहे. येणाऱ्या पाच वर्षात मतदार संघाचा चेहरा बदलण्यासाठी विकासपर्व येणार हे निश्‍चित आहे. येणारे सरकार भाजपा महायुतीचे असणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांची जुनी ओळख उदगीर व जळकोट तालूक्‍यातील सुजाण मतदार बंधू व माझ्या भगिनींना माहिती आहे. खोटा, रडण्याचा आव आणून आपले पाप धुतले जाणार नाही. त्यामुळे यावेळी नवीन धारण केलेली बेगडी ओळख मतदार शंभर टक्के पुसून टाकतील अशी टीकाही डॉ. कांबळे यांनी यावेळी केली. 

उदगीर मतदार संघातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत त्यामुळे या दोन महामार्गवर असलेल्या प्रत्येक गावाला नवी ओळख प्राप्त होणार असून तरूणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जळकोट तालुक्‍यातील बेळसांगवी पासून ते तिरुका, अतनूर, गव्हाणपर्यंत तिरु नदीवर तब्बल 7 पूल कम बॅरेजेसला 17 जानेवारी 2018 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. भाजपाचे पुन्हा सरकार येताच दुष्काळग्रस्त व डोंगरी ओळख असलेल्या जळकोट तालूक्‍यात नवीन हरित क्रांती येणार आहे. 

40 किलोमीटर लांब तिरु नदीपात्रात 2335 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार असून जवळपास 10 हजार एकर शेती बागायती होणार आहे. जळकोट तालुक्‍याच्या विकासासाठी बस आगार मंजूरी अंतिम टप्प्यात आहे. तसेच, 220 केव्हीचा विद्युत प्रकल्प पुर्णत्वास आलेला आहे. ज्यामुळे विजेची समस्या कायमस्वरूपी दुर होणार आहे. शिवाय, महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासंदर्भात संबधित मंत्रालय स्तरावर दोन बैठका झाल्या असून येणाऱ्या पाच वर्षांत ही मागणीही पूर्ण होणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले. 
उदगीर एमआयडीसीला मंजुरी 
उदगीर येथे शासकिय एमआयडिसीसाठी भाजप सरकारने पाऊल उचलले असून ऑगस्ट महिन्यात संबधित विभागाकडून जागा पाहणी करून सदरील एमआयडिसीला हिरवा कंदिल दाखवला आहे. येणाऱ्या पाच वर्षात जळकोटसाठी स्वतंत्र एमआयडिसी मिळावी यासाठी सरकार सकारात्मक राहणार आहे. उदगीरचा बंद पडलेला दुध भूकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली मागच्या पाच वर्षात झालेल्या आहेत. त्यात कारखाण्याची सध्याची स्थिती, यंत्राची स्थिती, बदललेल्या नविन तंत्राविषयी अभ्यासपूर्ण अहवाल, संबंधित मंत्रालयात सादर केलेला आहे. पून्हा सरकारमध्ये येताच प्राधान्य क्रमाने नवीन अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने दुध भुकटी प्रकल्प सुरु होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहनही शेवटी डॉ कांबळे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com