Anil Gote will not Resign | Sarkarnama

अनिल गोटेंचे राजीनामाअस्त्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर म्यान

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

अनिल गोटे 2009 पासून आजपर्यंत धुळ्यातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आपण स्वतः धुळ्याच्या महापौरपदाची निवडणुक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. धुळे महापालिका निवडणुकीपासून भाजपने आपल्याला दूर ठेवले जात असल्याचाही आरोप गोटे यांनी केला होता. धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपामधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला होता. निवडणुकीची सूत्रे भाजपाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यापासून पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे नाराज होते. त्यांनी महाजन यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनाही टीकेचे लक्ष्य केले होते.

मुंबई : धुळ्याच्या निवडणुकीत अनिल गोटे यांचे नेतृत्व मान्य करण्याची भूमिकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी पत्रकार स्पष्ट केल्यानंतर काही वेळातच गोटे यांनी पक्षाच्या विरोधात उपसलेले राजीनामाअस्त्र म्यान केल्याचे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरुन दिसून येत आहे. 

''पक्ष नेतृत्वाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. माझ्या कोणत्याही कामांना विरोध करणाऱ्याला पक्षाचे पदाधिकारी आणि मंत्रीच आर्थिक व शासकीय पातळीवरील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करुन पहिल्या दिवसापासून मदत करीत होते. यांसारख्या कारणांमुळे मी आता निर्णय केला आहे, की सोमवार (ता.19) रोजी विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी मा. अध्यक्षांना भेटून विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर करणार आहे'', असे गोटे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. 

त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गोटे राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. ''अनिल गोटे हे पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत. धुळे मतदारसंघात त्यांचे स्वतंत्र काम आहे. त्यामुळे ते महापालिका निवडणुकीत भाजपचे नेते म्हणून काम करतील. त्यांच्यासोबत भामरे आणि गिरीश महाजन यांनी एकत्र प्रचार करुन निवडणुका जिंकण्याचे पक्षाने ठरवले आहे.'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. 

अनिल गोटे 2009 पासून आजपर्यंत धुळ्यातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आपण स्वतः धुळ्याच्या महापौरपदाची निवडणुक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. धुळे महापालिका निवडणुकीपासून भाजपने आपल्याला दूर ठेवले जात असल्याचाही आरोप गोटे यांनी केला होता. धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपामधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला होता. निवडणुकीची सूत्रे भाजपाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यापासून पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे नाराज होते. त्यांनी महाजन यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनाही टीकेचे लक्ष्य केले होते.

मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याबाबत गोटे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात..
.......महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत 
माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका घेण्याचे मान्य केल्या बद्दल मी समस्त धुळेकर जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. 
दुसरी अत्यंत महत्वाची व धुळेकर जनतेच्या जिव्हाळ्याची बाब म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या एकाही व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार नाही.
 आता आपले शहर गुन्हेगारी मुक्ततेकडे वेगाने वाटचाल करेल. हा एक अत्यंत स्वागतार्ह निश्चय मुख्यमंत्र्यांनी घेतल्या मुळे गेल्या काही वर्षात गुंडांचे व गुन्हेगारांचे शहर म्हणून झालेल्या बदनामीतून आपली मुक्तता होवू शकेल. आपण शहरात आनंदोत्सव साजरा करावा एवढा महत्वाचा क्षण आहे. 
आतल्या अपार प्रेमा बध्दल व अतूट विश्वासा बद्दल मी आपला ऋणी आहे - 
अनिल गोटे, आमदार
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख