'राफेल'च्या राजकारणाला घाबरुनच डॉ. भामरेंना भाजपची उमेदवारी

'राफेल'च्या राजकारणाला घाबरुनच डॉ. भामरेंना भाजपची उमेदवारी

सध्याची लोकसभा निवडणुक राफेल विमान खरेदी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेले एअर स्ट्राइक यावर केंद्रीत आहे. अशा परिस्थितीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी नाकारल्यास विरोधक त्याचे राजकारण करतील. यातून वेगळा संदेश जाईल या एकमेव कारणामुळे डॉ. भामरे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला.

मालेगाव : सध्याची लोकसभा निवडणुक राफेल विमान खरेदी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेले एअर स्ट्राइक यावर केंद्रीत आहे. अशा परिस्थितीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी नाकारल्यास विरोधक त्याचे राजकारण करतील. यातून वेगळा संदेश जाईल या एकमेव कारणामुळे डॉ. भामरे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला.

आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ''गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सातत्याने जनतेची फसवणूक केली. स्वपक्षातील नेते, कार्यकर्त्यांना अडचणीत आणले. बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गाची घोषणा झाली असताना मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे भूमीपूजन झाल्याचे भासवून त्यांनी मतदारांची घोर फसवणूक केली. त्याविरुध्द आपला लढा आहे.'' त्यासाठी मी निवडणूक लढविणार असल्याचेही आमदार गोटे यांनी स्पष्ट केले

आमदार गोटे पुढे म्हणाले की, आम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत. मात्र त्यासाठी डॉ. भामरे यांना विजयी करण्याची गरज नाही. त्यांनी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा बाजार मांडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण तसे स्पष्टपणे सांगितले. मात्र राफेल प्रकरण व हवाई हल्ल्यामुळे सर्वांनी असमर्थता व्यक्त केल्यानंतर आपण समर्थपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघात सर्वाधिक निधी आणल्याचे डॉ. भामरे सांगतात. पंचवीस हजार कोटी रुपये आणले तर मग त्याची कामे कोठे सुरु आहेत? असा सवाल त्यांनी केला.

क्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातही डॉ. भामरे पिछाडीवर होते. भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. नंदुरबार ते नागपूर व धुळे ते सोलापूर या दोन राष्ट्रीय महामार्गांचे काम आपणच केल्याचे ते सांगतात. या दोन महामार्गाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तीस खासदारांचा त्यात काहीच हातभार नाही का? असा प्रश्‍न त्यांनी केला. गोटे म्हणाले इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय देखील डॉ. भामरे घेत आहेत. या दोन्ही महामार्गांच्या कामाला 2009 मध्येच मंजुरी मिळाली. 2011 मध्ये निविदा प्रसिध्द झाल्या. सध्या हे काम बंद पडले आहे. धुळे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबद्दल एक शब्दही वक्तव्य केले नाही. एखादे काम झाले नाही तर ते प्रामाणिकपणे सांगा. मतदारांची फसवणूक करु नका. फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे गोटे म्हणाले. यावेळी लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, सरमद पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com