अनिल देशमुखांनी आमदार सांभाळले; त्यांना गृहखात्याचे बक्षीस मिळाले

विदर्भाच्या वाट्याला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती आली आहेत.
anil deshmukh gets home department
anil deshmukh gets home department

नागपूर ः आठवडाभरापासून महाआघाडीत खातेवाटपावरून निर्माण झालेले मतभेद संपुष्टात आले असून नितीन राऊत यांना ऊर्जा, अनिल देशमुख गृह तर सुनिल केदार यांना पशु संवर्धन खाते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाआघाडीचे मंत्री जाहीर झाल्यानंतर खातेवाटप होत नसल्याने सर्वच अस्वस्थ होते. रोज नवे वाद समोर येत होते. कॉंग्रेसमुळेच खातेवाटप रखडल्याचा आरोपही केला जात होता. मागील सोमवारपासून खातेवाटपाची रोज चर्चा झडत होती. ते रविवारी सकाळी जाहीर झाले.

अनिल देशमुख यांना गृह खाते मिळाले आहे. या खात्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते यासाठी आग्रही होते. मात्र ते विदर्भाच्या वाट्याला आले आहे. अनिल देशमुख यांच्यासाठीसुद्धा ही मोठी बाब मानली जाते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला विश्वासात न घेता फडणवीस यांच्यासोबत पहाटेची शपथ घेतली होती. त्या वेळी देशमुख यांनी विदर्भातील राष्ट्रवादीचे आमदार पक्षासोबत ठेवण्याची काळजी घेतली होती. तसेच शरद पवारांना साथ देण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.  

नितीन राऊत यांनाही बढती मिळाली आहे. त्यांना महत्त्वाचे ऊर्जा खाते सोपवण्यात आले आहे. विजय वडेट्टीवारसुद्धा या खात्यासाठी उत्सुक होते. विदर्भात सर्वाधिक ऊर्जा प्रकल्प आहेत. भाजपच्या कार्यकाळात नागपूर जिल्ह्यातीलच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे खाते होते.

सुनिल केदार यांच्या खात्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना महिला व बाल कल्याण, यवतमाळचे संजय राठोड यांना वन तर चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार यांना खारपाण पट्टा व मदत व पुनवर्सन ही खाती सोपवण्यात आली आहेत. कळते. महाआघाडीच्या कार्यकाळात विदर्भाच्या वाट्याला गृह, ऊर्जा, महिला व बाल कल्याण, पशु संवर्धन, वन तसेच मदत व पुनर्वसन अशी महत्त्वाची खाती विदर्भाच्या वाट्याला आली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

मंत्री
1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

 2. श्री.अजित अनंतराव पवार,
उप मुख्यमंत्री
वित्त, नियोजन

3. श्री.सुभाष राजाराम देसाई
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4.  श्री.अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

 5. श्री.छगन चंद्रकांत भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

 6. श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क

7.  श्री.जयंत राजाराम पाटील
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8.  श्री. नवाब  मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

 9.  श्री.अनिल वसंतराव देशमुख
  गृह

10. श्री.विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल

11. श्री.राजेंद्र भास्करराव शिंगणे
अन्न व औषध प्रशासन

12. श्री. राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

 13.श्री. हसन मियालाल मुश्रीफ
   ग्राम विकास

14. डॉ.नितीन काशिनाथ राऊत
    उर्जा

15. श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
शालेय शिक्षण

16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड
   गृहनिर्माण

 17. श्री.एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18. श्री. सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19. श्री. विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. श्री. अमित विलासराव देशमुख
 वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21. श्री.उदय रविंद्र सामंत
उच्च व तंत्र शिक्षण

 22. श्री.दादाजी दगडू भुसे
कृषि, माजी सैनिक कल्याण

 23. श्री.संजय दुलिचंद राठोड
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24.श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता

25. ॲड. के.सी. पाडवी
आदिवासी विकास

26. श्री. संदिपानराव आसाराम भुमरे
रोजगार हमी, फलोत्पादन

27. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील

सहकार, पणन

28. ॲड. अनिल दत्तात्रय परब
परिवहन, संसदीय कार्य

 29. श्री. अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)
महिला व बालविकास

31. श्री.शंकराराव यशवंतराव गडाख
मृद व जलसंधारण

32.  श्री.धनंजय पंडितराव मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33. श्री. आदित्य उद्धव ठाकरे
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1. श्री. अब्दुल नबी सत्तार
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2.श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3.  श्री. शंभुराज शिवाजीराव  देसाई
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. श्री दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. श्री. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8. श्री. संजय बाबुराव बनसोडे
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10.श्रीमती आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com