'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी अनिल देशमुख आंध्र प्रदेशला रवाना

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा आणला आहे. या कायद्याची माहिती घेण्यासाठी देशमुख गेले आहेत
Home Minister Went to Andhra Pradesh to Take Information about DISHA Act
Home Minister Went to Andhra Pradesh to Take Information about DISHA Act

मुंबई : दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ अधिकारी आंध्रप्रदेशला रवाना झाले. 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा आणला आहे. या कायद्याची माहिती घेण्यासाठी देशमुख गेले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन हा कायदा महाराष्ट्रात तयार केला जाणार आहे. 

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. हिंगणघाट जळीत प्रकरणाने तर संपूर्ण देशभरात धक्का बसला. त्यानंतरही अनेक प्रकार घडले. आता महाराष्ट्र सरकारने हा विषय गंभीरपणे घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com