अनिल देशमुखही म्हणतात अजित पवारांना माफी नाही....

अनिल देशमुख हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात....
anil deshmukh warns ajit pawar
anil deshmukh warns ajit pawar

नागपूर : अजित पवारांनी जे केले, त्याला महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. अजित यांचा निषेध करतो. आम्ही पक्षासोबत आहो, शरद पवारांसोबत आहोत. आम्ही सदैव पक्षासोबत राहू, असे माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व काटोलचे आमदार अनिल देशमुख म्हणाले.

कालपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल असे चित्र होते. तसेच मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याचे सांगितले जात होते. खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची निवड केल्याचे सांगितले होते. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, शनिवारची पहाट सर्वांसाठी आश्‍चर्यकारक ठरली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास भाजपने अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजिप पवार यांची निवड झाली. मात्र, या सत्ता स्थापनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसची मान्यता नाही, असेही देशमुख म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com