पुन्हा दिसू लागला अनिल  देशमुखांचा करीश्‍मा

पुन्हा दिसू लागला अनिल  देशमुखांचा करीश्‍मा

काटोल (जि, नागपूर) : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान सातव्याफेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यानी 7 हजार 750 मतांची आघाडी मिळविली आहे. देशमुख यांचा करिश्‍मा मतदारसंघात कायम असल्याची ही पावती असल्याचे मानले जात आहे.

सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. काटोलमध्ये देशमुखांचा करिश्‍मा कायम असल्याची पावती देणारी ही निवडणूक ठरणार असल्याची आजही चर्चा कायम असून त्याची निश्‍चिती मतमोजणी दरम्यान मिळू लागली आहे. काटोलमधून दहा उमेदवार रिंगणात असून अपक्ष चरण कमल ठाकूर यांचाही त्यात समावेश आहे. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी देशमुखांनी पूर्ण तयारी केली होती हे विशेष.


मागील विधानसभा निवडणुकीत सलग चार वेळा विजयी ठरलेले अनिल देशमुख यांचा त्यांचे पुतणे व भाजपचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी धक्कादायक पराभव केला होता. यावेळी काटोमधून माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याचा सामना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख यांच्याशी आहे. थेट लढतीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मात्र निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.


आशिष देशमुख यांनी स्वपक्षीय सरकारच्या धोरणावर टीका करीत राजीनामा दिला. मात्र त्यापूर्वी चार वर्षात काटोलमध्ये फारसा जम नसलेल्या भाजपला संघटन वाढविण्याची मोठी संधी मिळाली. यामुळे काटोलमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी जोर लावला. अखेर उमेदवारी माळ चरणसिंग ठाकूर यांच्या गळ्यात पडली. मात्र, त्यांना काटोल सर करणे तेवढेच कठीण आहे. 


मागील पाच वर्षांत परायजनंतरही लोकांसाठी लढा उभारणारे अनिल देशमुख यांच्या वाड्यावर गर्दी वाढतच होती. याचमुळे त्यांना यावेळी विजयाची संधी असल्याचे वाटत आहे. अनिल देशमुखांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आल्यानेही त्याचाही प्रभाव मतदारांवर राहणार आहे. पूर्ण देशमुख कुटुंबीय प्रचारात उतरले होते. नरखेड तालुक्‍यातील दक्षीण व पश्‍चिमेकडील भागात अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला भेदणे ही त्याच्यासाठी खरी कसब ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com