आजचा वाढदिवस : माजी मंत्री अनिल देशमुख - anil deshmukh birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : माजी मंत्री अनिल देशमुख

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 मे 2019

9 मे 1950 रोजी नरखेड तालुक्‍यातील वडविहीरा येथे जन्मलेल्या अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

9 मे 1950 रोजी नरखेड तालुक्‍यातील वडविहीरा येथे जन्मलेल्या अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
काटोल हायस्कूल व त्यानंतर कृषी महाविद्यालयातून एम.एससी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. 1992 साली जिल्हा परीषद निवडणुकीत विदर्भातून सर्वाधिक मते घेऊन ते विजयी झाले. जिल्हा परीषद अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून राज्याचे कॅबिनेट मंत्री असेपर्यंत सतत 22 वर्षे लाल दिव्याच्या गाडीचा मान मिळविलेले जिल्यातील ते एकमेव नेते आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून जिल्यात संघटन मजबूत करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. जनतेशी थेट संपर्कामुळे जिल्हाभरात त्यांचे चाहते आहेत. राज्य सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असताना खासगी शिकवणी वर्गांवर त्यांनी वचक लावण्याचे धाडसी पाऊल उचलले. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबईच्या वरळी सी लिंकच्या कामाला त्यांनी गती दिली. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे ते आजही करताहेत.

काटोलनजिकच्या पारडसिंगा येथे गेल्या 17 वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतात. एका सोहळ्यात मुलगा सलिलचे लग्न लावून त्यांनी आदर्श स्थापीत केला. सतत यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून ते प्रबळ दावेदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख