anil deshmukh and home department | Sarkarnama

गृहमंत्रीपदाची माळ माझ्याच गळ्यात पडणार याची मला कल्पना होती - अनिल देशमुख

महेश जगताप
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे : नागपूर अधिवेशनातच आपल्याला गृहखाते मिळणार याची मला कल्पना आली होती, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात दिले. राज्याच्या दृष्टीने महत्वाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात स्पष्ट केले. हिंगणघाट येथील अत्याचारवर प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा बनवण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. 

आंध्र प्रदेशने तयार केलेल्या या प्रकारच्या कायद्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देत पक्षातील अनेक दिगग्ज नेते गृहमंत्री पदासाठी दावेदार असताना विदर्भातील पक्षाचे नेते देशमुख यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ गळ्यात घातली. या काळात गृहमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा होती. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा यात प्रमुाख्याने समावेश होता. या तिघांनीही नंतर या पदासाठी आपण नकार दिल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या नावाची चर्चा होती. गृहमंत्रीपदावरून सुमारे तीन-चार दिवस सस्पेन्स कायम होता. मात्र, पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ऐनवेळी देशुमख यांचे नाव पुढे केले. देशमुख यांचे नाव अचानकपणे अंतीम झाल्याने त्यावेळी पक्षातील आणि बाहेरील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी सुरवातीला विश्‍वासही ठेवला नव्हता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख