आमदार अनिल बाबर यांच्याविरुद्ध कट्टर कार्यकर्त्यानेच ठोकला शड्डू

anil babar`s loyalist gives challenges to babar
anil babar`s loyalist gives challenges to babar

पुणे : खानापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी  आमदार अनिल बाबर यांचे एकेकाळचे कट्टर  समर्थक शंकर मोहिते यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी काल सांगलीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.

मोहिते यांनी आजवर अनिल बाबर यांना साथ दिली होती. मात्र त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाबर यांनी संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. आता तर त्यांनी शिवसेना आणि भाजप अशी युती असताना खानापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. याची खानापूर मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

मोहिते यांची बाबर यांचे बाबर यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख होती. मात्र त्यांना सलग दोन निवडणुकीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी उमेदवारी डावलल्याने शंकर मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नाराजी व्यक्त करून बाबर गटापासून फारकत घेतली. त्यांनतर ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले. मराठा क्रांती मोर्चात त्यानी मोठे योगदान दिले होते. सामाजिक पटलावर सक्रिय होत डायमंड कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत होते.

गेल्या निवडणुकीत अनिल बाबर यांच्या विजयासाठी जोरदारपणे प्रयत्न करणाऱ्या मोहिते यांना आता आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी तालुक्यातील स्वतःच्या संघटनेच्या बळावर भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.  मोहिते हे खासदार संजयकाका पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यानी उमेदवारी मागितल्याने तालुक्यात चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com