anil babar and sanjay kaka not on same tune | Sarkarnama

आमदार बाबर यांचा पाठिंबा तरी संजयकाका म्हणतात जुळायचं नाही...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

सांगली : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात उमेदवार कोण हे न पाहता भाजपला साथ देण्याची घोषणा केली. अगदी खासदार संजय पाटील उमेदवार असतील तरी आपली तीच भूमिका राहील, असेही जाहीर केले.

अनिलभाऊंची ही टाळी संजयकाकांना मात्र सहजी पचलेली नाही. त्यांनी शिवसेनेच्या आधी अनिल बाबर यांना भूमिका जाहीर करण्याची घाई कसली झालीय, असे विचारत "बाबरांशी काही जुळायचं नाही', असाच संदेश दिला आहे. 

सांगली : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात उमेदवार कोण हे न पाहता भाजपला साथ देण्याची घोषणा केली. अगदी खासदार संजय पाटील उमेदवार असतील तरी आपली तीच भूमिका राहील, असेही जाहीर केले.

अनिलभाऊंची ही टाळी संजयकाकांना मात्र सहजी पचलेली नाही. त्यांनी शिवसेनेच्या आधी अनिल बाबर यांना भूमिका जाहीर करण्याची घाई कसली झालीय, असे विचारत "बाबरांशी काही जुळायचं नाही', असाच संदेश दिला आहे. 

खासदार पाटील आणि आमदार बाबर यांचा संघर्ष जुना आहे. दिवंगत आर. आर. पाटील हे बाबर यांच्यासाठी बंधुतुल्य मित्र होते. सहाजिकच, संजयकाकांनी आबांशी राजकीय संघर्ष करताना बाबर यांच्याशीही संघर्षाची भूमिका घेतली आणि ती आजही कायम आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात तासगाव तालुक्‍यातील विसापूर सर्कलचा समावेश आहे. त्यात आबांनी बाबर यांना तर संजयकाका सदाशिव पाटील यांना मदत करत आले. पक्षीय भिंती बाजूला सारून हा राजकीय डाव नेहमी रंगला. यावेळी तो अधिकच उघडपणे दिसू लागला आहे.

अशावेळी बाबर यांनी मुत्सद्देगीर दाखवत तासगावमध्ये येऊन लोकसभेसाठी भाजप उमेदवाराला पाठींब्याची घोषणा केली, विशेष म्हणजे विधानसभेला संजयकाकांनी मदत करावीच, अशी अट न घातला आपण ही भूमिका घेत असल्याचे जाहीर केले. हा डाव संजयकाकांची परीक्षा पाहणारा होता, पण स्वभावाप्रमाणे त्यांनी हा अवघड चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला आहे. 

विट्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याशी असलेल्या गट्टीमुळे संजयकाकांना बाबरांची कट्टी घेण्यावाचून पर्याय नाही, असेच दिसतेय. त्यामुळे शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर करण्याआधी बाबर यांना घाई का झालीय, असे त्यांनी विचारले. कुणी मदत करायला हात पुढे करत असेल तर अशी प्रतिक्रिया योग्य ठरेल का, हा सरळ माणसांसाठी प्रश्‍न पडू शकतो. परंतू, अनिल बाबर आणि संजय पाटील यांच्यातील राजकीय नातेसंबंध पाहता हा डाव वरवर दिसतो इतका सोपा नक्कीच नाही. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या वाढदिनी पुष्पगुच्छ दिल्यानंतर संजयकाकांनी बाबर यांच्या टाळीसाठी हात पुढे करण्यास नकार देण्याची भूमिका घेतली हे विशेष. 

अधिक-वजाबाकी 

खासदार संजय पाटील यांनी गेल्या एक-दीड वर्षात घेतलेल्या विविध राजकीय भूमिकांमुळे लोकसभा निवडणुकीचे मतांचे गणित मांडताना बऱ्याच वजाबाकी हाताशी येतात. त्यात काही ठिकाणी बेरजेचाही हिशेब आहे. अनिल बाबर यांनी बेरजेचे गणित घातल्यावर काकांनी त्याला छेद काय दिला, अशी चर्चा सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख