राष्ट्रपती राजवटीपूर्वी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला निमंत्रण दिले जाते - ऍड. श्रीहरी अणे

 राष्ट्रपती राजवटीपूर्वी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला निमंत्रण दिले जाते - ऍड. श्रीहरी अणे

मुंबई : निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात, निवडणूकपूर्व युतीने सत्तास्थापनेचा दावा केला नसेल तर जास्त आमदारसंख्या असलेल्या पक्षाला सरकार तयार करण्यासाठी बोलावले जाईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ, माजी महाधिवक्‍ता ऍड श्रीहरी अणे यांनी केले आहे. ते म्हणाले, निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यास कुणीही पुढे आले नाही तर राज्यपाल सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला निमंत्रण देतात. यासंबंधातील तरतुदी स्पष्ट आहेत. 

8 नोव्हेंबर रोजी सरकारचा कालावधी संपला तरीही विधीमंडळ मात्र खंडित झालेले नाही. विधानपरिषद हे तर स्थायी सभागृह आहेच, नव्या विधानसभेची प्रतिष्ठापना हा विषय भविष्यातला असला तरी विधानसभा भंग झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाने सत्तास्थापनेस नकार दिला तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रण देवू शकतो काय यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. 

नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्ष जबाबदारी सांभाळत असतानाही विश्‍वासमताची प्रक्रिया पूर्ण होवू शकते असे सांगून ऍड अणे म्हणाले, हंगामी अध्यक्ष पदावर असताना विश्‍वास मत घेतले जाण्याबद्दलची काही उदाहरणे आहेत. यापूर्वीही असे घडले आहे. हंगामी अध्यक्षाच्या कार्यकाळात विश्‍वासमत मिळाले तरी तो पक्ष राज्य करू शकतो. एकदा विश्‍वास मताचा ठराव पारित झाल्यानंतर पुढचे सहा महिने अविश्‍वास ठराव मांडता येत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजपने सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष या न्यायाने शिवसेना सहभागी झाली नाही तरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीच तर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या प्रसंगी या पक्षाची कसोटी लागेल असे मानले जाते. भाजपने पुढे केलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली नाहीत तर तो त्या सरकारचा पराभव मानला जातो. मात्र हंगामी अध्यक्षाच्या उपस्थितीत विश्‍वासमत मिळवता येते ही नवी माहिती समोर आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com