... आणि सुशीलकुमार शिंदे नाराज  झाले 

सुशीलकुमार शिंदे कोणत्याही मंत्रिपदापेक्षा गांधी घराण्यातील तीन पिढ्यांशी असलेले संबंध खूप महत्वाचे मानतात असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले .
Sushilkumar-Praniti-Shinde
Sushilkumar-Praniti-Shinde

सोलापूर :  आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश  झाला नाही म्हणून  खर्गे यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार कानावर आल्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खूप संतापले होते असे निकटवर्तीयांनी सांगितले . 

आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश  झाला नाही म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळणाऱ्या सोलापूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे यांनी शनिवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे माफीची याचना केली आहे. खर्गेंचा पुतळा जाळल्याने प्रणिती शिंदे यांना मदत होण्याऐवेजी त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या . त्यामुळे प्रणिती शिंदेंनी आपल्या समर्थकांना आपल्या भाषेत ' समजावल्या' नंतर माफीनामा सादर झाला आहे असे समजते . 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी  आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जोडलेले असल्याने दिल्लीत हा प्रकार आवडला नसता . त्यामुळे प्रणितीताईंनी आपल्या समर्थकांना चांगलेच पट्ट्यावर  घेतले असे समजते . पक्षश्रेष्ठीं कडे सुशीलकुमार शिंदे यांची अत्यंत चांगली प्रतिमा आहे . स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी तीन टर्म आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना मंत्रपद मिळावे असा आग्रह धरला असता तर ते काही अशक्य नव्हते .


 पण तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रीपदे कमी आणि प्रत्येकजणच इच्छुक असे चित्र होते . त्यामुळे आपण आग्रह धरून पक्षासमोरील अडचणी वाढवायच्या नाही अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली असल्याचे समजते .  खर्गे यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार कानावर आल्यावर सुशीलकुमार शिंदे खूप संतापले होते असे निकटवर्तीयांनी सांगितले . सुशीलकुमार शिंदे कोणत्याही मंत्रिपदापेक्षा गांधी घराण्यातील  तीन पिढ्यांशी असलेले संबंध  खूप महत्वाचे मानतात असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले .

दरम्यान शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे यांनी श्री.खर्गे यांच्याकडे माफीनामा पाठविला आहे. त्यात म्हटले आहे, आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश मंत्रीमंडळात झाला नाही. त्यामुळे माझ्यासह नाराज झालेल्या युवक कॉंग्रेसचेपदाधिकाऱ्यांनी आपला पुतळा जाळला. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे. हे कृत्य आम्ही प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून केले नाही.


 आमदार शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे आमच्या भावना अनावर झाल्या. आपण महाराष्ट्राचे प्रभारी असल्याने आपला पुतळा आम्ही जाळलो. या घटनेबाबत मी आणि आमचे सर्व पदाधिकारी आपली जाहीर माफी मागत आहोत. या प्रकरणावरून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे याही आमच्यावर रागावल्या आहेत. शहर व जिल्हा कॉंग्रेस समितीने आम्हाला नोटीसही बजावली आहे. आम्ही कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आमच्या कृत्यामुळे आपले मन दुखावले असेल तर आम्ही माफी मागतो व पक्ष जी शिक्षा देईल ती भोगण्यास आम्ही तयार आहोत, असेही या माफीनाम्यात म्हंटलेले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com