आणि पंतप्रधानांचे ट्विटर अकौंट सात कर्तृत्ववान महिलांनी चालविले....

.....
आणि पंतप्रधानांचे ट्विटर अकौंट सात कर्तृत्ववान महिलांनी चालविले....

नवी दिल्ली : कोट्यवधींचे फॅन फॉलोइंग असणारे आपले ट्‌विटर अकौंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रातील सात कर्तृत्ववान महिलांना चालविण्यासाठी दिले. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे. यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने गौरविलेल्या पुण्याच्या रश्‍मी उर्ध्वरेषे यांच्यासह विविध राज्यांतील 14 महिलांशी त्यांनी संवाद साधला व तुम्ही देशासाठी प्रेरणा ठरला आहात, असे गौरवोउद्‌गार काढले. 

पंतप्रधानांनी आपले ट्विटर हॅंडल चालविण्यास दिलेल्या सात महिलांसह इतरांच्याही प्रेरक कथा जगासमोर आणण्याचा उद्देश होता.यावेळी एका यूजरने चक्क पंतप्रधानांनाच पासवर्ड विचारला तेव्हा फूड बॅंकेच्या संस्थापक स्नेहा मदनदास यांनी त्याला "नवा भारत... लॉग इन' चे प्रयत्न करा, असे सणसणीत उत्तर दिले त्याला असंख्य लोकांचे लार्क्‍स मिळाले. 

राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या 15 पैकी 14 कर्तृत्ववान महिलांशी मोदींनी दुपारी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. 
103 वर्षांच्या धावपटू मान कौर यांचे आशीर्वाद घेताना मोदींनी, तुम्ही खेलो इंडियातही होतात, अशी आठवण काढली तर 96 व्या वर्षी साक्षरता परीक्षेत अव्वल येणाऱया कार्तितायनी अम्मा यांच्यासह या मिळून साऱ्यांजणींना त्यांनी सांगितले की तुम्ही जेव्हा तुमच्या तुमच्या भागांत काम सुरू केले तेव्हा एक मिशनच्या रूपात ते सुरू केले तुम्ही कोणत्या पुरस्कारासाठी हे केलेले नाही म्हणूनच तुम्ही देशासाठी प्रेरणा बनला आहात. 

पश्‍मीना शालींसह काश्‍मीरच्या वस्त्रओद्योगात महिलांचे योगदान वाढविणाऱ्या काश्‍मीरच्या आरीफा यांनी, मागच्या वर्षी इंटरनेट बंद झाल्याने आमचे सारे काम खराब झाले असे सांगण्याचे धाडस दाखविताच पंतप्रधानांनी हसत हसत, आता ते पुन्हा सुरू झाल्यावर तुमचा व्यवसाय आणखी कसा बहरतो ते बघा असे उत्तर दिले. 
रश्‍मी उर्ध्वरेषे यांनी 1977 मध्ये ज्या ऑटोमोबाईल इंडिनिअरिंग क्षेत्रात पाऊल ठेवले त्यावेळपासून आताही या क्षेत्रातील पुरूषांच्या वर्चस्वाला मात देऊन केलेला आपला प्रवास उलगडला व 36 वर्षांच्या लढाईचे आज सार्थक झाले असे सांगितले. 

भारतीय हवाई दलाच्या पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या मोहना सिंह, अवनी चतुर्वेदी व भावना कांत यांनी आपल्या यशाची गाथा उलगडली. पर्यावरण कार्यकर्त्या चामी मूर्मू, निलजा वांगमू, राजमिस्त्री कलावती देवी, गिर्यारोहणाच्या क्षेत्रात जगभरात नाव गाजविणाऱया ताशी व नुंशी मलिक, गायिका कौशिकी च्रकवर्ती व कर्तियायिनी अम्मा यांनी आपापले अनुभव सांगितले. तीन मुली झाल्याने पतीने सोडून दिल्यावर तान्ह्या मुलींसह माहेरी आलेल्या तेलंगणातील भूदेवी यांनी ग्रामसभेत केलेले काम सांगताच पंतप्रधानांनी, "तुम्ही तर छान हिंदी बोलता', अशी पावती दिली. 
नौटंकी नको - येच्युरी 
पंतप्रधांनांनी महिला दिनानिमित्त आपले ट्‌विटर हॅंडल महिलांना चालविण्यास दिल्याच्या प्रयोगाचे सार्वत्रिक स्वागत झाले त्याचवेळी काही विरोधाचे प्रखर सूरही उमटले. माकप नेते सीताराम येचुरी यांनी, मोदी यांनी अशी नाटके (नौटंकी) करू नयेत. त्यापेक्षा महिला आरक्षणाचे विधेयक सहा महिने संसदेत बाजूला पडले आहे ते मंजूर करावे व महिलांबाबतचा आदर कृतीतून दाखवून द्यावा, असा टोला लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com