anant gudhe shivsena | Sarkarnama

आजचा वाढदिवस : माजी खासदार अनंत गुढे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 मार्च 2018

अमरावती शहरात शिवसेनेची बांधणी करण्यात अनंत गुढे यांची मोठी भूमिका राहिली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्‍वासही त्यांनी संपादन केला होता. या कामाची दखल घेऊन 1999 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी गुढे यांना दिली. त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रा. सू. गवई यांचा पराभव केला. जनसंपर्काच्या भरवशावर गुढे यांनी सलग तीनवेळा अमरावतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. अमरावती मतदारसंघ आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले.

अमरावती शहरात शिवसेनेची बांधणी करण्यात अनंत गुढे यांची मोठी भूमिका राहिली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्‍वासही त्यांनी संपादन केला होता. या कामाची दखल घेऊन 1999 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी गुढे यांना दिली. त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रा. सू. गवई यांचा पराभव केला. जनसंपर्काच्या भरवशावर गुढे यांनी सलग तीनवेळा अमरावतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. अमरावती मतदारसंघ आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले. ते सध्या शिवसेनेचे संघटन भक्कम करण्याचे काम करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख