गाडगीळांच्या घरात जन्मलो नसतो तर कॉंग्रेस सोडली असती - अनंत गाडगीळ

 गाडगीळांच्या घरात जन्मलो नसतो तर कॉंग्रेस सोडली असती - अनंत गाडगीळ

पुणे : ऐन निवडणुकीच्या काळात प्रदेश कॉंग्रेसमधील रोज नवा गोंधळ समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी प्रदेश कॉंग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेश कॉंग्रेसचा कारभार पाहता मी गाडगीळांच्या घरात जन्मलो नसतो तर कॉंग्रेस सोडली असती, अशी प्रतिक्रिया त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली आहे. 

चंद्रपूरमधील एका कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत दूध्वनीवरून साधलेला संवाद शनिवारी राज्यभर चर्चेचा विषय होता. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीनामा देण्याची भाषा करीत असल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. थेट माध्यमांशी न बोलता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेला हा संवाद पक्षाच्या कामाबद्दल त्यांची नाराजी दर्शविणारा आहे. गाडगीळ हे पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत. काकासाहेब गाडगीळ यांचे नातू व बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ अनंतराव हे पुत्र आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसनिष्ठ घराण्यातील गाडगीळ यांची विधान परिषदेतील अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. त्यामुळे गाडगीळ यांच्या या नाराजीला विशेष महत्व आहे. 

पुण्यातील उमेदवारीचा गोंधळ संपायला तयार नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी पुण्याचा उमेदवार ठरत नाही. निष्ठावंत विरूद्ध बाहेरचे उमेदवार अशी अंतर्गत लढाई गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरू आहे. गाडगीळ हेदेखील सुरवातीला इच्छुक होते. मात्र, प्रदेश कॉंग्रेसने पाठविलेल्या तीनजणांच्या यादीत गाडगीळ यांचे नाव नव्हते. तेव्हापासून ते अलिप्त आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com