आजचा वाढदिवस : आमदार आनंदराव पाटील (कऱ्हाड)  - Anandrao patil birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : आमदार आनंदराव पाटील (कऱ्हाड) 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

विजयनगर (कऱ्हाड) येथील असलेले आनंदराव पाटील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सरपंच ते आमदार असा प्रवास त्यांनी कॉंग्रेस पक्षात राहून केला आहे

विजयनगर (कऱ्हाड) येथील असलेले आनंदराव पाटील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सरपंच ते आमदार असा प्रवास त्यांनी कॉंग्रेस पक्षात राहून केला आहे. 1974 मध्ये ते "एनएसयूआय'चे सदस्य झाले. त्यानंतर कराड तालुका युवक कॉंग्रेस चे सात वर्षे अध्यक्ष होते. 1885 ते 2001 पर्यंत 15 वर्षे ते युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. 2001 मध्ये ते जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. 2004 पर्यंत ते अध्यक्ष होते. 1992 ते 96 ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. तसेच 9 वर्षे ते विजयनगर कराडचे सरपंच राहिले. 

सध्या ते जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विजयनगर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महाकाली सहकारी सोसायटी, कृष्णा, कोयना ऍग्रो प्रक्रिया संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. नुकतीच त्यांची राष्ट्रकुल परिषदेसाठी निवड झाली असून ते परिषदेसाठी रवाना झाले आहेत.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख