राहुल कुलांचा रमेश थोरातांना दे धक्का! : राष्ट्रवादीतील आनंद थोरात, महेश भागवत भाजपमध्ये

राहुल कुलांचा रमेश थोरातांना दे धक्का! : राष्ट्रवादीतील आनंद थोरात, महेश भागवत भाजपमध्ये

केडगाव ः दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात व पुणे जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष सिताराम भागवत यांचे पुत्र महेश भागवत यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ असणा-या या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 भागवत व थोरात यांनी राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने रमेश थोरात यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या थोरात व भागवत यांनी उघड नाराजी व्यक्त केली. आमदार राहुल कुल यांनी भाजप प्रवेशासाठी मध्यस्थी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मध्यरात्री पहाटे एक वाजता मुंबईत प्रवेश केला. कुल, थोरात, भागवत यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली.

गेली २० वर्ष थोरात व भागवत यांना रमेश थोरात यांनी डावलत असताना ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले. यावेळी थोरात व भागवत यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला असताना रमेश थोरात यांनी विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या सर्व प्रकारातून आनंद थोरात व भागवत समर्थक नाराज होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिस-या क्रमांकावर असणारे राजाराम तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कुल यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते नंदू पवार यांनी राहुल कुल यांना पाठिंबा दिला आहे. तांबे, भागवत व थोरात यांच्या प्रवेशामुळे राहुल कुल यांचे विधानसभा निवडणुकीतील डावपेचांत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 

काकासाहेब थोरात आणि सीताराम भागवत हे दोघेही 1978 ला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. आता त्यांच्या मुलांना राहुल कुल सोबत घेऊन या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com