आणि आनंद दिघे यांची स्मृतीस्थळ दिव्यांनी उजळले! - Anand Dighe memorial illuminated | Politics Marathi News - Sarkarnama

आणि आनंद दिघे यांची स्मृतीस्थळ दिव्यांनी उजळले!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ठाणे शहर दिवाळीच्या रोषनाईने उजळत असताना ठाणे शहरातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळावर मात्र अंधार असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन भाऊबीजेच्या निमित्ताने शक्तीस्थळावर दिवे लावून आनंद दिघे यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

ठाणे : ठाणे शहर दिवाळीच्या रोषनाईने उजळत असताना ठाणे शहरातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळावर मात्र अंधार असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन भाऊबीजेच्या निमित्ताने शक्तीस्थळावर दिवे लावून आनंद दिघे यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

ठाणे शहरातील नागरिकांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या दिघे यांच्या समाधीकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल केदार दिघे यांनी खंत व्यक्त केली आहे. पुतण्या असल्यामुळे दिघेसाहेबांच्या समाधीवर दिवे लावण्यासाठी आपण येथे आलो असून पक्षांच्यावतीनेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निवडणूकांच्यावेळी धर्मवीरांचे नावाने मतांचा जोगवा मागितला जात असताना सण उत्सवांच्या काळात तरी त्यांच्या आठवणींना दिव्यांच्या प्रकाशात उजळण्याची गरज असल्याचे केदार दिघे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

दिवाळीच्या निमित्ताने घराघरांमध्ये विद्युत रोषनाई केली जात असताना यंदा प्रथमच ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील चौकांमध्ये, रस्त्यांवर आणि उड्डाण पुलाच्याखाली विद्युत रोषनाई करून शहर उजळून टाकले आहे. शहरातील तलापलाळीचा परिसर, महत्वाचे चौकांमध्ये आकाशकंदील आणि विद्युत दिव्यांचा लखलखाटाने शहरातील नागरिकांचे डोळे दिपून गेले आहे. परंतु त्याचवेळी ठाण्यातील सत्ताकारणामध्ये महत्वाचे नाव असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी मात्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता असताना दिघे यांच्या समाधी अंधारात असल्याची माहीत मिळताच केदार दिघे यांनी समाधी असलेल्या शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन या ठिकाणी दिव्यांनी शक्तिस्थळ उजळून काढले. त्यांच्यासोबत अन्य काही कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. दिवाळीच्या काळात दिघे यांच्या समाधीवर अंधार अत्यंत दुदैवी असल्याची खंत केदार दिघे यांनी व्यक्त केली. 

पुतण्याची जबाबदारी म्हणून दिवे लावले...
सत्ताकारणातील महत्वाचे नाव असलेल्या आनंद दिघे यांच्या नावाशिवाय ठाण्यातील राजकारण पुर्ण होऊ शकत नाही. ठाणेकरांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या दिघे यांच्या पश्चात त्यांची शक्तिस्थळ ही समाधी उभारण्यात आली असून ऐन दिवाळीमध्ये ती अंधारात होती. पुतण्या म्हणून या समाधीवर दिवे लावून दिघे यांना श्रध्दांजली अर्पण करण्याची आपली जबाबदारी होती. त्याच जबाबदारीतून दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. दिघे यांच्या समाधीवरील दिवाळीत अंधार ही अत्यंत दुदैवी बाब आहे. चुकून जरी हा प्रकार झाला असला तरी निवडणूकीच्या काळात धर्मवीरांचा विसर पडलेला आपल्यास दिसत नाही, अशी प्रतिक्रीया केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख