anand chajed joins bjp | Sarkarnama

काॅंग्रेसला शिवाजीनगरमध्ये धक्का : आनंद छाजेड भाजपमध्ये

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री दिवंगत चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. छाजेड यांच्या प्रवेशामुळे काॅंग्रेसला ऐन निवडणुकीत धक्का बसला आहे.

पुणे : काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री दिवंगत चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. छाजेड यांच्या प्रवेशामुळे काॅंग्रेसला ऐन निवडणुकीत धक्का बसला आहे.

छाजेड कुटुंब हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे समर्थक मानले जात होते. चंद्रकांत छाजेड हे दोन वेळा आमदार व एकदा महापौर  होते. त्यांनी पर्यटन राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. आनंद हे पुणे महापालिकेत एक टर्म नगरसेवक होते. बोपोडी परिसरात त्यांचा प्रभाव आहे. काॅंग्रेस एकनिष्ठ म्हणून त्यांची ख्यात होती. त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यातील काॅंग्रेसला पुन्हा गळती सुरू झाली आहे.

भाजपचे शिवाजीनगर येथील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सहभागी होऊन छाजेड यांनी भाजपचे कामही सुरू केले. काॅंग्रेसने दत्ता बहिरट यांनी शिवाजीनगर येथून उमेदवारी दिल्याने छाजेड नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. छाजेड यांच्यासह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील काही सदस्य हे भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले. ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख