खेड गटाच्या आघाडीने माणिकराव कोकाटेंची आमदारकीला गवसणी

दोन आमदारांचा तालुका असलेल्या इगतपुरीमध्ये यंदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कौल दिला आहे. सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांना अवघ्या 2,072 मतांनी विजयी झाले. त्यांना इगतपुरीच्या टाकेद गटातुन 3,871 मतांची आघाडी मिळाली. या आघाडीनेच कोकाटे यांना आमदारकीला गवसणी घालता आली.
Manikrao Kokate - Rajabhu Waje
Manikrao Kokate - Rajabhu Waje

नाशिक : दोन आमदारांचा तालुका असलेल्या इगतपुरीमध्ये यंदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कौल दिला आहे. सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांना अवघ्या 2,072 मतांनी विजयी झाले. त्यांना इगतपुरीच्या टाकेद गटातुन 3,871 मतांची आघाडी मिळाली. या आघाडीनेच कोकाटे यांना आमदारकीला गवसणी घालता आली. 

एरव्ही सामाजिक विभाजनाने निवडणुकीचे चित्र फिरत होते. गेल्या दोन निवडणुकांपासून इगतपुरीतील खेड जिल्हा परिषद गट कोणाकडे यावर सिन्नरचा आमदार ठरु लागला आहे. श्री. कोकाटे जिल्ह्यातील सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेत. गेल्या दोन निवडणुकांत हा गट जिकडे झुकेल तिकडे विजयाचा पारडे फिरते, असे समिकरण बनले आहे. या गटात कोकाटे यांना 14,171 तर शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना 10,300 मते मिळाले. 

यंदाची निवडणुक अतिशय अटीतटीची होती. सुरवातीपासूनच वाजे यांचे पारडे जड होते. त्यांनी मतदारांशी संपर्क, विकासकामे, प्रतिमा व पक्ष या सर्वच दृष्टीने आघाडी घेतली होती. सिन्नरच्या सामाजिक धृविकरणातही त्यांना वंजारी व मराठा या दोन्ही समाजांचा पाठींबा होता. त्या तुलनेत कोकाटे यांची उमेदवारी ऐनवेळी ठरली. त्यांच्यात सिन्नर तालुक्‍यात अटीतटीची लढत झाली. त्यात वाजे वरचढ ठरले. मात्र, शेवटच्या टप्प्यात कोकाटे यांना मिळालेली आघाडी त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली.

मतदारसंघाची फेररचना 2009 मध्ये झाली. त्यात टाकेद- खेड व वाडीवऱ्हे गटातील चाळीस गावे सिन्नर मतदारसंघात समाविष्ट झाली. आमदार सिन्नरचा मात्र निर्णायक ठरतात ते इगतपुरीचे मतदार. 2009 च्या निवडणुकीतही कोकाटे यांना या गटातून आघाडी होती. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेल्या कोकाटे यांना येथुन फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीत काय होणार हे अनिश्‍चित होते. मात्र, टाकेद गटाने दिलेला पाठींबा निर्णायक ठरला. निवडणुकीत टाकेद गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य रतन जाधव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, केरु दादा खतेले, पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, गटप्रमुख वसंत भोसले, मधुकर कोकणे आदींनी महत्वाची भूमिका बजावली.

माझ्या प्रत्येक निवडणुकीत टाकेद गटातील जनतेने मला भरघोस मताधिक्‍य दिले आहे. माझ्या विजयात हा गट निर्णायक राहिला. हे मताधिक्‍य व प्रेम हे विसरण्याजोगे नाही. कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास विकासाची कामे करूनच निश्‍चित सार्थक करीन - आमदार माणिकराव कोकाटे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com