'यांना' गृहित धरणे शिवसेनेला नडले?

राज्यात सत्ता स्थापनेच्या खेळात आता शिवसेना तोंडघशी पडली आहे. भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरणं शिवसेनेला महागात पडलंय. दिल्या मुदतीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याची पत्र न मिळाल्यानं आता शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे.
Devendra Fadanavis - Uddhav Thakrey
Devendra Fadanavis - Uddhav Thakrey

पुणे : राज्यात सत्ता स्थापनेच्या खेळात आता शिवसेना तोंडघशी पडली आहे. भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरणं शिवसेनेला महागात पडलंय. दिल्या मुदतीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याची पत्र न मिळाल्यानं आता शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात सत्तास्थापनेचा खेळ सुरु होता. शिवसेनेने पहिल्या दिवसापासून आक्रमक रहात अखेर भाजप बरोबरचा घरोबा तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करण्याचा घाट घातला होता. पण अखेरीस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेना एकाकी पडली. भाजपने सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावले. पण दिल्या मुदतीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होती. शिवसेना नेते संजय राऊत शरद पवार यांच्या संपर्कात होते. आज दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दीड तास चर्चाही झाली. त्याच वेळी दिल्लीत काँग्रेसचीही बैठक सुरु होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह त्यांचे कुटुंबिय शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विरोधात होते. तरीही काँग्रेसने आपल्या आमदारांची मते जाणून घेतली. पण अखेरपर्यत पाठिंब्याचे पत्र दिले नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले पाठिंब्याचे पत्र दिले नाही. दुसऱ्या बाजूला भाजप सगळ्या घडामोडींकडे पहात होती. दिवसभर भाजपच्याही बैठका सुरु होत्या. आता उद्या रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांच्या निमंत्रणावर हो किंवा नाही हा निर्णय द्यावा लागणार आहे. सुरुवातीपासूनच आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस करत होती. पण तरीही त्यांच्या पाठिंब्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न होते. पण अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरणे शिवसेनेला महागात पडल्याचे आतातरी दिसत आहे. दुसऱ्या बाजूला सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात हरलेला भारतीय जनता पक्ष पराभूत होऊनही जिंकल्याच्या मानसिकतेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com