विधानसभेला नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन; शिवसेनेला सर्वाधीक फटका

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रसने सर्वाधीक 8.89 लाख मतांसह सहा जागांवर विजय संपादन केला. त्या तुलनेत शिवसेनेला सर्वाधीक फटका बसला. नऊ जागांवर उमेदवार दिलेल्या शिवसेनेला 6.33 लाख मते मिळाली. मात्र, केवळ दोन जागा जिंकता आल्या. त्या तुलनेत राष्ट्रवादीची संख्या चार वरुन सहावर पोहोचली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण झपाट्याने बदलले असे चित्र मतदानातुन स्पष्ट झाले आहे.
Chagan Bhujbal - Dada Bhuse
Chagan Bhujbal - Dada Bhuse

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रसने सर्वाधीक 8.89 लाख मतांसह सहा जागांवर विजय संपादन केला. त्या तुलनेत शिवसेनेला सर्वाधीक फटका बसला. नऊ जागांवर उमेदवार दिलेल्या शिवसेनेला 6.33 लाख मते मिळाली. मात्र, केवळ दोन जागा जिंकता आल्या. त्या तुलनेत राष्ट्रवादीची संख्या चार वरुन सहावर पोहोचली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण झपाट्याने बदलले असे चित्र मतदानातुन स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात (कंसात मताधिक्‍य) नरहरी झीरवाळ (60,813), माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (56,515), राज्यमंत्री दादा भुसे (47,892), सरोज अहिरे (41,644), मौलाना मुफ्ती (38,519), दिलीप बोरसे (33,694), हिरामण खोसकर (31,555), देवयानी फरांदे (28,320), डॉ. राहुल आहेर (27,744) यांनी लक्षणीय मतांची आघाडी घेतली.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा जागांवर उमेदवार देऊन 8,89,630 मते मिळाली. यातील सहा जागांवर ते जिंकले. शिवसेनेने नऊ उमेदवार दिले होते. त्यांना 6,33,349 मते मिळाली. यातील तीन विद्यमान आमदारांचा पराभव होऊन त्यांना केवळ दोन जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने सहा उमेदवारी दिले. त्यांना 4,36,773 मते मिळाली. त्यांच्या सर्व चारही जागा राखत बागलाणचे दिलीप बोरसे यांच्यामुळे एक जागा वाढली. 

कॉंग्रेस पक्षाने पाच मतदारसंघात उमेदवार दिले. त्यात त्यांना 3,58,960 मते मिळाली. त्यांच्या दोन जागा होत्या. यातील मालेगावचे विद्यमान आमदार दादा भुसे एकमेव विजयी झाले. नांदगावला सुहास कांदे ही जागा अधिकची ठरली. मात्र राजाभाऊ वाजे (सिन्नर), अनिल कदम (निफाड), योगेश घोलप (देवळाली) या तीन आमदारांचा अनपेक्षीत पराभव झाला. यातील देवळाली मतदारसंघ तीस वर्षे शिवसेनेकडे होता. निफाडमध्ये अनिल कदम यांचा हॅटट्रीकसाठी प्रयत्न होता. मात्र मतदारांनी हे सर्व गणित विस्कटले.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व तेरा मतदारसंघात शिवसेना व भाजपने मोठी आघाडी घेतली होती. लोकसभेला शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना 5.63 लाख तर भाजपच्या भारती पवार यांना 5.67 लाख मते मिळाली. धुळे मतदारसंघात समाविष्ट मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाणया तिन्ही मतदारसंघात भाजपला आघाडी होती. युतीला एकंदर 13.86 लाख मते होती. विधानसभेला ती 10.70 लाखांवर घसरण होऊन 3.16 लाख मते घटली. त्या तुलनेत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला लोकसभेत दारुन पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

कॉंग्रेस आघाडीला 8.50 लाख मते मिळाली. विधानसभेला ती वाढून 12.48 लाख झाल्याने 3.98 लाख मते वाढली. वाढलेली व घटलेली मते जागांच्या संख्येत परावर्तीत झाली. शिवसेना, भाजप युतीकडे प्रत्येकी चार अशा आठ जागा होत्या. त्या सातवर घसरल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे सहा जागा होत्या त्या सातवर गेल्या. माकपचे जे. पी. गावीत यांचा पराभव झाला. कॉंग्रेसला आपल्या बालेकिल्ला मालेगावतच आसीफ शेख यांच्या पराभवाची झळ बसली.

'एमआयएम' चे मौना मुफ्ती यांनी कॉंग्रेसकडून मालेगाव मतदारसंघ हिसकावून घेतला. एकंदर युतीला फटका तर कॉंग्रेस आघाडीला लाभ अशी स्थिती आहे. लोकसभेला 2.55 लाख मते घेतलेल्या वंचित आघाडीचा प्रभाव लक्षणीयरित्या घठला. त्यांना अवघी 59 हजार मते मिळाली. अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com