Amruta Fadnavis enjoys bullock cart ride | Sarkarnama

अमृता फडणवीस यांची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूर्ण 

उत्तम कुटे 
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

.

पिंपरी: बैलगाडीत बसण्याची सौ.अमृता फडणवीस यांची  इच्छा सोमवारी पिंपरी चिंचवडमधील भोसरीत पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या  इंद्रायणी थडी यात्रेत त्यांनी बैलगाडीतून फेरफटका मारला.

८ तारखेपासून भरलेल्या इंद्रायणी जत्रेचा समारोप करण्यासाठी अमृता फडणवीस  मुंबईहून आल्या होत्या. यावेळी जत्रेच्या प्रवेशद्वारापासून त्यांना बैलगाडीत बसविण्यात आले . सुमारे ५०० मीटर्स अंतरावर असलेल्या व्यासपीठापर्यंत त्यांना भोसरीचे प्रगतीशील  शेतकरी श्री भुजबळ  यांच्या बैलगाडीतुन नेण्यात आले .   यात्रेच्या उदघाटनाला पंकजा मुंडे आल्या होत्या . त्यांनीही बैलगाडीच्या सफरीचा आनंद घेतला होता . 

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की , माझी बैलगाडीत बसण्याची बालपणापासून इच्छा होती.आज ही इच्छा पूर्ण झाली आहे . 

यात्रेच्या  समारोपप्रसंगी . सौ . फडणवीस  म्हणाल्या ," स्त्री कर्तृत्ववान असते. फक्त तिला आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. ती  संधी आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून हजारों महिलांना उपलब्ध करुन दिली आहे."
    
    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख