राज्यातील राजकीय बदलाचा परीणाम `मिनीमंत्रालय'वर

राज्यात काल भाजपचे सरकार कोसळल्यानंतर जिल्ह्याचे "मिनीमंत्रालय' असलेल्या जिल्हापरिषदेतही जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यात आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. त्याचा परिणाम जिल्हापरिषदेच्या राजकारणावरसुद्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील राजकीय बदलाचा परीणाम `मिनीमंत्रालय'वर

अमरावती ः राज्यात काल भाजपचे सरकार कोसळल्यानंतर जिल्ह्याचे "मिनीमंत्रालय' असलेल्या जिल्हापरिषदेतही जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यात आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. त्याचा परिणाम जिल्हापरिषदेच्या राजकारणावरसुद्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोंडीना चांगलाच वेग आला होता. विशेष म्हणजे जिल्हापरिषदेतही अध्यक्षपदाचे वारे वाहण्यास सुरवात झाली. राज्यातील सरकारप्रमाणेच जिल्हापरिषदेतही जोडतोडीला वेग येणार असे समजले जात होते. त्यासाठी भाजप तसेच सहयोगी सदस्यांनी हालचाली सुद्धा सुरू केल्या. मात्र काल पुन्हा सत्तेचे वासे फिरले आणि "मिनीमंत्रालया'तील शिलेदारांना धडकी भरली. 

जिल्हापरिषदेत कॉंग्रेस व शिवसेनेच्या सत्ता स्थापनेला "ब्रेक' लावण्यासाठी काही मंडळींनी "फिल्डींग' लावण्यास सुरवात केली. मात्र राज्यातील सत्ताकारण बदलल्याने त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लागणार आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद ओबीसी संवर्गासाठी राखीव असून या पदासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची आघाडी पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरली आहे. यावेळी सुद्धा हाच प्रयोग यशस्वी होणार असा विश्‍वास आघाडीतील नेतेमंडळींना आहे.

असे आहे संख्याबळ
कॉंग्रेस ः 26, भाजप ः 13, प्रहार ः 5, शिवसेना ः 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस ः 5, युवा स्वाभिमान ः 2, लढा ः 1, अपक्ष ः 1, बसपा ः 1, स्वाभिमानी शेतकरी ः 1 (देवेंद्र भुयार), आरपीआय ः 1 (बळवंत वानखडे)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com