आमदार यशोमती ठाकूर व नवनीत राणा यांनी फुगडीवर धरला ताल!

अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या फुगडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या...!
आमदार यशोमती ठाकूर व नवनीत राणा यांनी फुगडीवर धरला ताल!

अमरावती  : अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या फुगडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या...!

कुऱ्हा येथे कार्तिकी दिंडी सोहळ्याकरीता शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असताना सौ. नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी टाळ मृदूंगाच्या तालावर धरलेल्या फुगडीने उपस्थितांच्या भुवया शुक्रवारी उंचावलेल्या पहायला मिळाल्या. 

नुकत्याच झालेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.गत निवडणुकीत अमरावती लोकसभेत कित्येक दिग्गजांना पाणी पाजणाऱ्या नवनीत राणांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता,त्यानंतरही त्या मतदारसंघात सक्रिय राहल्या,अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा ह्या विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना पुढील निवडणूकीतही जोरदार टक्कर देण्याची क्षमता ठेवत असून लोकसभा निवडणुकीतील पराभवा नंतरही नवनीत राणा यांना निवडणूकीचे मैदान सोडले नाही,नवनीत राणा ह्या जिल्हात सर्वच ठिकाणी परिचित असून जिल्हात वर्षभरातील कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित राहतात.

आमदार रवी राणा हे अपक्ष आमदार असूनही ते आक्रमक व नेहमी चर्चेत राहतात. दुसरीकडे भाजपा व काँग्रेस पक्षाला देखील दमदार उमेदवार मिळाला नसून आयात केलेल्या उमेदवार आता अमरावतीकर स्वीकारणार नसल्याची भावना असून अमरावती जिल्ह्यातीलच उमेदवार सर्वच पक्ष शोधत आहे. त्यामुळे नवनीत राणा ह्या काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुक तिकीट मिळाले तर आश्चर्य वाटल्यासारखे नव्हे, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीसुध्दा चांगले संबंध असल्याने येणाऱ्या लोकसभेत रवी राणांची मैत्री जोर धरते की यशोमतींसोबतची फुगडी रंग आणते हे येणारी वेळच ठरवणार आहे.

आमदार यशोमती ठाकूर ह्या काँग्रेस पक्षातील एकमेव महिला आमदार असून त्यांचा पक्षात वेगळा दबदबा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळील यशोमती ठाकूर असून काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिनीत यशोमती ठाकूर यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले होते. तर ठाकूर यांना मेघालय,बंगलोर या विधानसभा निवडणूकीचा प्रभार सुद्धा काँग्रेस पक्षाने दिला होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com