अमरावती: भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे वाद , नगरसेवक फुटणार ? 

निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना व एका पाठोपाठ एकाच व्यक्तीला पदे देण्याच्या निर्णयावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करून असंतोषाला तोंड फोडले आहे.
amravati municipal corporation
amravati municipal corporation

अमरावती :  महापौरपदाच्या निवडणुकीत सदस्यांची फाटाफुट होऊ नये यासाठी भाजपमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यातील सत्तेचे समीकरण बदलल्यामुळे स्थानिक पातळीवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. निष्ठावंत विरुद्ध बाहेरचे यासह एकाच व्यक्तीला अधिक पदांचा लाभ, असा वाद उफाळून आला आहे. त्यातून सदस्यांची फाटाफुट होण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

चेतन गावंडे यांचे महापौर व कूसूम साहू यांचे उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नामनिर्देशन करण्यात आले. मात्र या दोन्ही नावांना आता पक्षांतर्गत विरोध वाढला आहे. मुळ भाजपमधील काही सदस्यांनी निष्ठावंतांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करून असंतोषाला तोंड फोडले आहे.

प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा सुर चांगलाच गाजला. चेतन गावंडे यांना स्थायी समिती, जिल्हा विकास प्रारूप आराखडा समिती, शिक्षण सभापती अशी पदे देण्यात आली आहेत. त्यांनाच महापौरपद देण्यावर आक्षेप आहे.

तर, कूसूम साहू यांना उपमहापौरपद देताना निष्ठावंतानावर अन्याय करण्यात आल्याचा आक्षेप आहे. श्रीमती साहू जनविकासमधून भाजपमध्ये गत निवडणुकीत आल्या. त्यांना मोठी पदे दिली जातात व मुळ भाजपच्या सदस्यांनी सतरंज्याच उचलायच्या का असा प्रश्‍न नेत्यांना केल्या गेला.

महापौरपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहण्याचा इशारा काही सदस्यांनी नेत्यांसमक्षमच दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. सेनेने निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केल्याने विजयासाठी लागणाऱ्या मतांचा आकडा घसरला आहे.

संख्याबळावर विजय मिळवावा लागणार आहे. कॉंग्रेसने भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरवात केली असून त्यांची भाजपमधील असंतुष्ट सदस्यांवर नजर आहे. त्यांच्यातील काही सदस्य फोडता येतात का याची चाचपणी सुरू आहे.

दरम्यान, भाजपच्या कोअर समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असंतुष्ट सदस्यांची समजूत काढण्याचे व उफाळून आलेला वाद शमविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक झाली.

सदस्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर या हालचालींना प्रारंभ झाला असून असंतुष्टांना मनवण्याचे काम कोअर समितीने सुरू केले आहे. प्रदेश नेत्यांच्या बैठकीनंतर कोअर समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराज सदस्यांना गटागटाने बैठक घेत समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. शुक्रवारी निवडणूक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com