आमदार रवी राणांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एआयएमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप

विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या आदल्या दिवशी आमदार रवी राणा यांनी फोनवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी केला. याविरोधात 'एमआयएम'च्या समर्थकांनी काल पोलिस आयुक्तालयावर धडक दिली.
MLA Ravi Rana
MLA Ravi Rana

अमरावती : विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या आदल्या दिवशी आमदार रवी राणा यांनी फोनवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी केला. याविरोधात 'एमआयएम'च्या समर्थकांनी काल पोलिस आयुक्तालयावर धडक दिली.

नगरसेवक अब्दुल नाजीम अब्दुल रऊफ हे घरी असताना त्यांना दुपारी तीन वाजून 22 मिनिटांनी आमदारांचा फोन आला. त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप अ. नाजीम यांनी पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनातून केला. अ. नाजीम हे महापालिकेत 'एमआयएम'चे गटनेते आहेत. आपल्याविरुद्ध आमदारांकडून षडयंत्र रचल्या जाण्याची शक्‍यताही त्यांनी तक्रारीत नमूद केली. शिवाय आपल्याला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी सीपींना दिलेल्या निवेदनातून केली.

संबंधित नगरसेवकाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत. या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हा आरोप केला असून त्यात तत्थ्य नाही.
- रवी राणा, आमदार, बडनेरा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com