अमरावती विभागानेही केली अजित पवारांची पाटी कोरी 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्‍लीन चिट' दिली आहे. अमरावती विभागाचे विशेष तपास पथकाने जिगाव व इतर सहा सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारामध्ये पवार यांची भूमिका तपासून पाहिली.
Amravati Antii Corrruption Division Also Gives Clean Chit to Ajit Pawar
Amravati Antii Corrruption Division Also Gives Clean Chit to Ajit Pawar

नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही 'क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. 

नियमानुसार, कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे, पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. 

अमरावती विभागाचे विशेष तपास पथकाने जिगाव व इतर सहा सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारामध्ये पवार यांची भूमिका तपासून पाहिली. त्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. त्यावर पवार यांनी दिलेली उत्तरे, 'महाराष्ट्र गव्हर्नमेन्ट रुल्स ऑफ बिजनेस ऍन्ड इन्स्ट्रक्‍शन्स'मधील नियम व अन्य विविध पुरावे लक्षात घेता पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची जबाबदारी निश्‍चित केली जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढला आहे. जल संसाधन विभागाचे मंत्री विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे पदशिस्त अध्यक्ष असतात. 

मात्र, महाराष्ट्र गव्हर्नमेन्ट रुल्स ऑफ बिजनेस ऍन्ड इन्स्ट्रक्‍शन्सनुसार जल संसाधन विभागाचे सचिवांनी तर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कायद्यानुसार, महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सिंचन प्रकल्पांचे टेंडर, खर्च मंजुरी इत्यादीमधील कायदेशीर बाबी तपासणे आवश्‍यक होते. त्यातील अवैधता त्यांनी जल संसाधन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होते. तसे केल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत. अधिकाऱ्यांच्या या कृतीसाठी तत्कालीन जल संसाधन मंत्री पवार यांना जबाबदार धरता येणार नाही, असे 'एसीबी'च्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com