अमरावती जिल्हा परिषदेत भाजप जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला...

 अमरावती जिल्हा परिषदेत भाजप जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला...

अमरावती : जिल्हा परिषदेतील अखर्चित निधीच्या मुद्द्यावरून काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या कक्षात धुडगूस घातला. या घटनेनंतर अध्यक्ष गोंडाणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. आज युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातच भाजप जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी व जिल्हा परिषद सदस्यांनी काल जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी शासनाकडे परत गेल्याचा मुद्दा उपस्थित करीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या कक्षात ठिय्या दिला. तेथून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या कक्षात प्रवेश करून तेथे राडा केला. संतप्त कार्यकर्त्यांनी कक्षातील राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच आमदार वीरेंद्र जगताप यांचे छायाचित्र काढून टाकले होते. या प्रकारानंतर आज युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेत दाखल झाले आणि त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचा पुतळा जाळला. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. आंदोलनात युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख, प्रदेश सचिव समीर जवंजाळ, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, नीलेश गुहे, सागर यादव, आशीष यादव, किरण महल्ले, तन्मय मोहोड, सचिन राठोड आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आपल्या अनुपस्थितीत भाजपच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी कक्षात प्रवेश करून खुर्चीला हार घातला. त्यानंतर कक्षातील छायाचित्रे काढून धुमाकूळ घातला. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पोलिसांत दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com