Yashwant Ambedkar : सुर्यपुत्र 'भैयासाहेब आंबेडकर' यांचा जीवन प्रवास..तुम्हाला माहीत आहे का ?

सरकारनामा ब्यूरो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत आंबेडकर म्हणजेच भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर या नावाने सर्वश्रुत आहेत. भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले.

Yashwant Ambedkar | Sarkarnama

भैय्यासाहेब आंबेडकरांनी समाजहितासाठी बिकट परिस्थितीत खचून न जाता, न डगमगता आपले संपुर्ण आयुष्य समाजासाठी वाहिले अशा या सुर्यपुत्राची काल म्हणजेच 12 डिसेंबरला जयंती होती.

Yashwant Ambedkar | Sarkarnama

भैयासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेची जबाबदारी खांद्यावर घेत. चैत्यभूमी, दीक्षाभूमीचे निर्माण त्यांनी केले.

Yashwant Ambedkar | Sarkarnama

भैय्यासाहेबांनी 'भारतभूषण प्रिंटिंग प्रेस' हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे नाव 'बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस' असे झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या 'जनता', 'प्रबुध्द भारत' या मुखपत्रांचे व्यवस्थापन त्यांनी बघितले.

Yashwant Ambedkar | Sarkarnama

बाबासाहेबांच्या थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध आणि त्याचा धम्म इत्यादी पुस्तकांचे मुद्रण व प्रकाशन बुधभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये झाले.

Yashwant Ambedkar | Sarkarnama

'बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया'च्या माध्यमातून धम्म प्रसाराचे कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांनंतर बौद्ध दीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढण्यामागे भैय्यासाहेबांचे मोठे योगदान आहे. भैय्यासाहेबांनी आंबेडकरी चळवळ गावागावापर्यंत पोहचवली. 

Yashwant Ambedkar | Sarkarnama
CTA image | Sarkarnama