'आमच्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात का पाठवला?'

अनुराधा धावडे

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने आदित्य ठाकरे यांनी काल (२४ सप्टेंबर) पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे मोठा जन आक्रोश आंदोलनाची हाक दिली.

Aditya Thackeray

तळेगाव दाभाडे येथे बोलताना त्यांनी राज्य सरकारवर पुन्हा आगपाखड केली.

Aditya Thackeray|

या आंदोलनात आदित्य ठाकरेंनी, हे खोके सरकार जिथे कुठे येईल तिथे त्यांना, माझ्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात का पाठवला, याचा जाब विचारा.' असे आवाहन या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण तरुणींना केले.

Aditya Thackeray|

राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर वेदांता-फॉक्सकॉनचा हा प्रोजेक्ट आपण महाराष्ट्रातचं आणला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray|

पण आज महाराष्ट्रातील तरुणांना राज्यात नवनवीन उद्योग येणार की नाही हाच मोठा प्रश्न पडला आहे, असंही ते म्हणाले.

Aditya Thackeray|

वेदांता फॉक्सकॉन प्रोजक्ट महाराष्ट्रात, तळेगावात येणार हे शंभर टक्के ठरलं होतं.

Aditya Thackeray|

पण सरकार बदलताच तोच प्रोजक्ट शेजारच्या राज्यात कसा पळवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Aditya Thackeray|

हा प्रोजक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अनेकदा बैठकाही झाल्या.

Aditya Thackeray|

दावोस दौऱ्यावर असताना आम्ही या वेदांताचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्याशी बोलून महाराष्ट्रासाठी ८० हजार कोटींची गुतवंणूक आणली होती. विचार करा किती रोजगार मिळाले असते,

Aditya Thackeray|

पण त्याचवेळी चाळीस गद्दार आणि विरोधीपक्ष स्वत:ला वाचवण्यासाठी महाराष्ट्राला मागे टाकायला निघाले होते.

Aditya Thackeray|