Anuradha Dhawade
बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन सध्या राज्यात राजकारणात राजकारण तापलं आहे.
बारसू गावात कातळ शिल्प सापडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध केला आहे.
कातळशिल्पांच्या आसपास तीन किलोमीटरपर्यंत कुठलाच विकास प्रकल्प करता येत नाही असं राज ठाकरे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.
युनेस्कोला बारसू गावात कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को हे जगभरातील अनेक वास्तूंचे जतन करत असते.
कातळ शिल्प असलेला तीन किलमीटरचा परिसरात हा प्रकल्प करू शकत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कातळ शिल्पे म्हणजे अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे, भित्तीचित्रे किंवा दगडांवर कोरलेली चित्रे.
1990 मध्ये रत्नागिरीतील निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामादरम्यान जांभ्या दगडावर ही 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली.
ही कातळशिल्पे म्हणजे अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.