Anuradha Dhawade
वरुण गांधी यांचा जन्म 13 मार्च 1980 रोजी दिल्लीत झाला.
वरुण गांधी फक्त तीन महिन्यांचे असताना त्यांचे वडील संजय गांधी यांचे निधन झाले.
तर ते चार वर्षांचे असताना त्यांची आजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली.
वयाच्या 19 व्या वर्षी, वरुण गांधी त्यांच्या आई मेनका गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या पिलीभीतमधील निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच दिसले.
वारसाहक्काने मिळालेल्या कौटुंबिक राजकीय पक्षाचा नेता म्हणून लोकांनी आपल्याला ओळखावे यापेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले
2004 च्या निवडणुकीत, भाजपने वरुण गांधींना मुख्य प्रचारक म्हणून रिंगणात उतरवले होते
परंतु त्यांच्या कुटुंबाचे चुलत भाऊ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि काकू सोनिया गांधी यांच्या विरोधात बोलण्यास नकार दिला.
नोव्हेंबर 2004 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा समावेश करण्यात आला.
मार्च 2013 मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी वरुण गांधी यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आणि ते पक्षाचे सर्वात तरुण सरचिटणीस बनले.
मे 2013 मध्ये त्यांना पश्चिम बंगालमधील भाजपच्या कारभाराचे प्रभारी बनवण्यात आले.