कोण आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?

अनुराधा धावडे

द्रौपदी मुर्मूचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात एका संथाल कुटुंबात झाला.

Presidential election|

त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू होते. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही त्यांच्या गावचे प्रमुख होते.

Draupadi Murmu

द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. दुर्दैवाने दोन्ही मुलगे आणि त्यांचे पती हे तिघेही वेगवेगळ्या वेळी अकाली मरण पावले. त्यांची मुलगी विवाहित असून भुवनेश्वर येथे राहते.

Presidential election in India

द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये पहिल्यांदा रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

Draupadi Murmu

त्यांनी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही होत्या.

Draupadi Murmu news

द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून दोनदा विजयी झाल्या आणि त्या आमदार झाल्या.

Presidential elections in india

नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि ओडिशातील भाजप युती सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू यांना 2000 ते 2004 दरम्यान वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री करण्यात आले.

Presidential election| Draupadi Murmu

द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 मध्ये झारखंडचे 9 वे राज्यपाल बनवण्यात आले. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली.

Presidential election| Draupadi Murmu

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गेला. त्याच वेळी, कोणत्याही भारतीय राज्याच्या राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या आदिवासी आहेत.

Draupadi Murmu news

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.