Ashok Chavan : "काँग्रेसमध्ये काही राहिलेले नाही, भाजपात या" ; अशोक चव्हाणांना ऑफर देणारे भाजपचे नेते कोण?

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Ashok Chavan | Sarkarnama

यात माजी मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं नाव असल्याचं बोललं जात होतं.

Ashok Chavan | Sarkarnama

चव्हाणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचीही चर्चा होती.

Ashok Chavan | Sarkarnama

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि शिंदे गटात इन्कमिंगची संख्या वाढली आहे.

Ashok Chavan, Eknath Shinde | Sarkarnama

महाविकास आघाडी मधाील नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा जोर धरतांना दिसली. मात्र, अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Ashok Chavan with Sharad Pawar | Sarkarnama

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेसचे 'सात' आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. 

Ashok Chavan | Sarkarnama

काँग्रेसचे हे 'सात' आमदार कोण याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Ashok Chavan | Sarkarnama

त्यातचं भाजपचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांनाच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama