Anuradha Dhawade
भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.
या जागेकडे भाजप सह महाविकास आघाडीच्याही अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत दिवंगत गिरीष बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यादेखील या जागेसाठी उत्सुक आहेत.
सुरुवातीला बापट कुटूंबातून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. पण आता स्वरदा बापट यादेखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडण्यास तयार असल्याची इच्छा स्वरदा बापट यांनी व्यक्त केली आहे.
बाबांच्या बाकी राहिलेल्या कामांसाठी मी किंवा इतर कोणताही उमेदवार असला तरी आम्ही प्रयत्नशील राहू. अशी इच्छा स्वरदा बापट यांनी व्यक्त केली आहे.
पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वासही स्वरदा बापट यांनी व्यक्त केला आहे.