Sunil Dhumal
महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
स्नेहल जगताप काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीपदी कार्यरत होत्या. त्या महाडमधील काँग्रेसचा चेहरा समजल्या जात होत्या.
स्नेहल जगताप काँग्रेसचे मात्तब्बर नेते माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्नेहल जगतापांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केला.
जगताप यांच्या रुपाने ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करण्यापूर्वी स्नेहल जगताप यांनी रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले.
काँग्रेसने नेहमीच सन्मान दिला. माणिक जगताप आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष सारखाच असल्याचे जगताप यांनी सांगितले.
महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याची भावनाही स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली.