रश्मी ठाकरेंची तुलना केलेल्या राबडी देवी कोण?

अनुराधा धावडे

राबडी देवी यादव या बिहारच्या माजी मुख्यमंत्री आहेत. 25 जुलै 1997 रोजी त्यांनी पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली.

चारा घोटाळ्यात त्यांचे पती लालू प्रसाद यादव दोषी आढळल्यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी राबडी देवी पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या.

राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य म्हणून त्यांनी तीन वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून काम केले आहे. राबडी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या तेव्हा भारतीय राजकीय इतिहासातील अनेकांसाठी हा मोठा धक्का होता.

बिहारमधील गोपालगंज येथे 1956 साली राबडी देवींचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे.

राबडी देवी यांनी 1973 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आणि 7 मुली आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी त्या पूर्ण गृहिणी होत्या. त्यांचा 1997 ते 1999 हा त्यांचा पहिला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता.

राबडी देवी यांनी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर त्यांची पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली.

2005 च्या विधानसभा निवडणुकीतही राबडी देवी वैशालीच्या राघोपूर मतदारसंघातून विजयी झाल्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत तिने सारण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.