Panjabrao Dakh : हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख कोण आहेत?

Ganesh Thombare

पंजाबराव डख कोण आहेत?

हवामानाचा आणि पावसाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख कोण आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Panjabrao Dakh

हवामानाचा अंदाज

पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांचे हितचिंतक

हवामानाचा अंदाज सांगून शेतकऱ्यांचे नुकसान टाळणारे पंजाबराव डख हे कोट्यवधी शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत.

व्हाट्सअ‍ॅप-युट्युबचा वापर

हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पंजाबराव डख हे व्हाट्सअ‍ॅप आणि युट्युबचा वापर करतात.

प्रगतशील शेतकरी

पंजाबराव डख हे प्रगतशील शेतकरी असून शेतीबाबतही त्यांचा चांगला अभ्यास आहे.

मूळ परभणीतील

पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव या गावातील आहेत.

शिक्षण किती झाले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबराव डख यांची पदवी झालेली असून त्यांनी ईटीडी आणि सीटीसी कोर्स केलेले आहेत.

शिक्षक म्हणून कार्यरत

पंजाबराव डख हे जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Next : क्राईम रिपोर्टर ते खासदार ! ठाकरे गटाची धडाडती तोफ संजय राऊतांचा राजकीय प्रवास...