Om Prakash Mathur: महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून चर्चेत असणारे ओम प्रकाश माथुर कोण आहेत? जाणून घ्या!

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती.

Om Prakash Mathur | Sarkarnama

जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा मोदींना बोलून दाखवली होती. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी अनेक नावं समोर येत आहे. 

Om Prakash Mathur | Sarkarnama

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून ओम माथूर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Om Prakash Mathur | Sarkarnama

भाजपचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश माथूर राजस्थानमधील फलना येथील बेडल गावचे रहिवासी आहेत. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य आहेत.

Om Prakash Mathur | Sarkarnama

याआधी ते राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.

Om Prakash Mathur | Sarkarnama

ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Om Prakash Mathur | Sarkarnama

ओम माथूर हे गुजरात भाजपचे सरचिटणीसही आहेत. ओमप्रकाश माथूर हे छत्तीसगडचे राज्य प्रभारी बनण्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या राज्य प्रभारीपदाची जबाबदारी सांभाळत होते. याआधी ते गुजरात आणि महाराष्ट्राचे प्रभारी होते.

Om Prakash Mathur | Sarkarnama

माथूर हे 'आरएसएस'चे राष्ट्रीय प्रचारकही राहिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयात माथूर यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

Om Prakash Mathur | Sarkarnama
Om Prakash Mathur | Sarkarnama