Lula da Silva : तिसऱ्यांदा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे कोण आहेत लुला डा सिल्वा

Anuradha Dhawade

लुईझ इनासिओ लुला डा सिल्वा यांनी आज (२ जानेवारी) तिसऱ्यांदा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

Lula da Silva :

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जैर बोल्सोनारो यांचा लुला डा सिल्वा यांच्याकडून पराभव झाला.

Lula da Silva :

लुला यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या गेले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांना आठ भावंडे होती.

Lula da Silva :

वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि शेंगदाणे विकण्यापासून ते बूट कंपनीत काम केले.

Lula da Silva :

काम करत असताना त्यांनी कामगार संघटनेच्या रूपाने कर्मचाऱ्यांचा आवाज उठवला आणि अनेक संपाचे नेतृत्व केले.

Lula da Silva :

लष्करी हुकूमशाहीला आव्हान देत 1980 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Lula da Silva :

अनेकवेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. 1989, 1994 आणि 1998 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळाला नाही.

Lula da Silva :

तीन वेळा राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतरही हार न मानता त्यांनी 2002 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला

Lula da Silva :

यानंतर त्यांना पुन्हा एकदा विजय मिळाला, नंतर तुरुंगात गेल्यावर त्यांना निवडणूक लढवता आली नाही, पण जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा ते जिंकले.

Lula da Silva :

एकदा त्यांनी राजकारणापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता, पण फिडेल कॅस्ट्रो यांच्या सांगण्यावरून ते पुन्हा राजकारणात परतले, असे बोलले जाते.

Lula da Silva :