Anuradha Dhawade
पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या किरण पटेल गेल्या चार महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमधून पंतप्रधान कार्यालयात विशेष सचिव म्हणून काम करत होता.
तिथे त्याने या जम्मू काश्मीरमधील अधिकार्यांसोबत बैठका घेत त्याने झेड प्लस सुरक्षाही मिळवली
याच काळात त्याने पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील (LOC) अतिशय संवेदनशील ठिकाणी भेटीगाठी दिल्या.
किरण पटेल हा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी असून आपण पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याचा दावा केला आहे.
पण गुप्तचर यंत्रणांना 2 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रीनगर पोलिसांनी तोतया पटेलला २ मार्च ला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भाई पटेल यांच्याकडे 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि दोन मोबाईल फोन सापडले आहेत.
किरण भाई पटेल यांच्यावर बनावट हुद्दा आणि कागदपत्रांद्वारे Z+ सुरक्षा घेतल्याचा आणि सामान्य माणसाला मनाई असलेल्या ठिकाणी जाण्याचा आरोप आहे.
किरण पटेल ने मोठमोठ्या नेतेमंडळींसोबत असलेले फोटो दाखवून संबंधित अधिकाऱ्यांनाही फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.