आयपीएस अधिकारी ते तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष, कोण आहेत अण्णामलाई...

सरकारनामा ब्यूरो

कर्नाटक केडरचे पूर्व आयपीएस अधिकारी के अन्नामलाई यांची 8 जुलै रोजी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

K. Annamalai | Sarkarnama

तामिळनाडूमध्ये वयाच्या 36 व्या वर्षी प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारणारे ते सर्वात कमी वयाचे भाजप नेते आहेत.

K. Annamalai | Sarkarnama

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आयपीएस अधिकारी म्हणून कर्नाटकच्या पोलीस दलात एक काळ गाजवला आहे.

K. Annamalai | Sarkarnama

कोएंबतूर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लखनऊ आयआयएममधून एमबीएचं शिक्षण घेतलं.

K. Annamalai | Sarkarnama

समाजसेवा- देशसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी करायची' "ठरवली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी आयपीएस म्हणून लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली.

K. Annamalai | Sarkarnama

पोलीस दलात दहा वर्षांची सेवा देत त्यांनी 25 मे 2019 रोजी आपल्या पदाचा राजीमाना दिला. राजीनामा दिला त्यावेळी ते बंगळुरु दक्षिणचे डीसीपी होते. 

K. Annamalai | Sarkarnama

उडपीमध्ये S.P. असताना त्यानी आपली कारकीर्द गाजवली. तिथल्या कॉलेजात ड्रग माफियांचं जाळं होतं. त्यांनी अण्णानं मोडून काढलं. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना 'सिंघम ऑफ उडपी' ही पदवी मिळाली.

K. Annamalai | Sarkarnama

25 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं होतं. 

K. Annamalai | Sarkarnama

नंतरच्या दीड वर्षात त्यांनी तामिळनाडूमध्ये जे लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ते अभूतपूर्व आहे. के. अन्नमालाई यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे आता तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

K. Annamalai | Sarkarnama