Sunil Dhumal
पुण्यातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांना 'एटीएस'ने अटक केली. त्यांना ९ मेपर्यंत 'एटीएस' कोठडी सुनावण्यात आली.
कुरुळकरांवर हेरगिरी करण्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत सुरक्षा-संवेदनशील माहिती सामायिक केल्याच्या आरोप आहे.
प्रदीप कुरुळकर यांचा जन्म 1963 मध्ये झाला. त्यांनी 1985 मध्ये 'सीओईपी' पुणे येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये (बीई) पदवी प्राप्त केली.
1988 मध्ये कुरळकरांनी आवाडी येथे 'डीआरडीओ'साठी काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, त्यांनी IIT कानपूर येथून 'अॅडव्हान्स्ड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स' अभ्यासक्रम पूर्ण केला.
क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची रचना आणि विकास, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करातील मोबाइल मानवरहित प्रणाली या क्षेत्रात त्यांचा हतखंडा आहे.
आता ते संशोधन आणि विकास आस्थापना (डीआरडीओ)च्या प्रीमियर सिस्टम्स अभियांत्रिकी प्रयोगशाळेत संचालक म्हणून कार्यरत होते.
एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून, कुरुळकर यांनी लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणांच्या डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.